"निवडणूक आयोग तर भाजपा आयोग झाला आहे"


बिहार मध्ये झालेल्या मतमोजणी नुसार भाजप करण्यात आघाडीला बिहार मध्ये स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदीत राज यांनी ईव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“महागठबंधन जिंकलं तरी मी ईव्हीएम घालवण्यासंबंधी सांगणार आहे. ईव्हीएम गेलंच पाहिजे. निवडणूक आयोग तर भाजपा आयोग झाला आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. याचवेळी उदीत राज यांनी ट्विट केलं असून “अमेरिकेमध्ये जर ईव्हीएमवर निवडणूक झाली असती तर ट्रम्प यांचा पराभव झाला असता का?”, असं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments