"पंकजा मुंडे भाजपवर नाराज नाहीत" - चंद्रकांत पाटील



 भाजप नेत्या पंकजा मुंडेही नाराज नाहीत. साखर कारखान्याच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. तुम्हाला काही शंका असेल, तर त्यांना फोन लावून देऊ का,' असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनाच करत सोमवारी त्रागा व्यक्त केला.

पदवीधर निवडणुकीसाठी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, प्रीतम मुंडे, आमदार अतुल सावे, संभाजीराव पाटील निलंगेकर, हरिभाऊ बागडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, पदवीधरचे उमेदवार शिरीष बोराळकर उपस्थित होते. बोराळकरांचे नाव निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियावर बहुजनांवर अन्याय होत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 

पदवीधर निवडणुकीत तिकीट वाटपावरून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याचे पत्रकारांनी पाटील यांना विचारले. तेव्हा पाटील म्हणाले, 'पंकजा मुंडे नाराज नाहीत. माध्यमांना हात जोडून विनंती करतो. तुम्ही जांभेकरांचे वंशज आहात. बातमी जशी आहे तशी द्यायला हवी.' या वक्तव्यावर काही पत्रकारांनी आक्षेप घेत, 'आम्ही जांभेकरांचे वंशज नाही,' असे सांगितले. त्यावर पाटील यांनी त्वरित खुलासा करत 'हे विधान चांगले पत्रकार या अर्थाने आहे. तुम्ही त्यांचे दिन विशेष साजरे करता. गैरसमज नसावा,' असे म्हणत सारवासारव केली.

Post a Comment

0 Comments