ठेकेदाराने अवैध उत्खनन करून शासनाला कोट्यावधी रूपयांचा गंडा युवा सेने बेमुदत आंदोलन


अकलूज/प्रतिनिधी:

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू आहे. अकलूज ते पंढरपूर दरम्यानच्या रस्ता कामासाठी संबंधीत ठेकेदाराने अवैध उत्खनन करून हजारो ब्रास मुरूमाची चोरी करून मुरूमाची परस्पर विल्हेवाट लावली आहे. यामध्ये शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडवून ठेकेदाराने गंडा घातल्याचा आरोप युवा सेनेचे अध्यक्ष स्वप्नील वाघमारे यांनी केला आहे. 
  
अकलूज प्रांत कार्यालयासमोर उत्खनन केलेल्या मुरुमाच्या पाचपट दंडाची रक्कम आकारून संबंधित ठेकेदाराकडुन शासनाचा बुडविलेला महसूल वसुल करावा, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

माळशिरस तालुक्यातील खळवे गावात शासनाची कोणतीही परवानगी नसताना अवैध मुरूम उत्खनन व वाहतुक जात आहे. शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडविल्याचे युवा सेनेच्या माध्यमातून प्रशासनासमोर आणुन दिले आहे. तरीही प्रशासनाने अवैधरित्या मुरूम उत्खनन होणारी वाहतूक त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाकडून अवैधरित्या मुरूम उत्खननाचे पंचनामे केले होते मात्र हे पंचनामे प्राथमिक स्वरूपाच्या असल्यामुळे हे पंचनामे ग्राह्य न धरता,  त्यांची फेरपंचनाम्याचे आदेश असूनही दंडात्मक कारवाई करण्यास महसूल विभाग जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. फक्त कागदी घोडे नाचवुन लालफितीचा कारभार केला जात असल्याचा आरोप  युवासेना जिल्हाप्रमुख वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

युवा सेनेचे वाघमारे म्हणले, शासनाची शुद्ध फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडविल्याचे प्रशासनासमोर आणुन दिले आहे. हे प्रशासनाने मान्यही केले आहे. परंतु फेरपंचनाम्याचे आदेश असुनही दंडात्मक कारवाई करण्यास तलाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. फक्त कागदी घोडे नाचवुन  लालफितीचा कारभार केला जात आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, ठेकेदार व महसुल प्रशानाचे आर्थिक लागेबंध असु शकतात. या अवैधरित्या उत्खननामध्ये तलाठी ते तहसीलदार सहभागी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून वाघमारे यांनी केली

Post a Comment

0 Comments