मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेसची स्वतंत्र लढणार..??


महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस  सर्व २२७ जागांवर लढेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल. हायकमांडने आदेश दिले तर २२७ जागांची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. 

(Advertise)

निवडणुकांसंदर्भात अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीचे एकत्र जमले नाही तर काँग्रेस एकटी लढेल, असे गायकवाड म्हणाले. 
(Advertise)

मात्र याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर काँग्रेस कसेही लढली तरी पराभव नक्की आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी मारला आहे. Post a Comment

0 Comments