वाहनचालकांनी दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता आहे ,राज्यात ७०० कोटी रुपयांहून अधिक ई-चलन थकीत आहे.याविषीयीची सविस्तर माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
याबाबत राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात.तसेच नोटीस सहसा वाहन मालकाला बजावल्या जातात मात्र काही प्रकरणांमध्ये पत्ते योग्य नाहीत किंवा दिलेला मोबाइल क्रमांक चुकीचा निघतो असे अनेक अडथळे असले तरी येत्या काही दिवसांत चांगल्या वसुलीसाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू तसेच गरज पडल्यास आम्ही चुकीच्या वाहनचालकांचे परवाने तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करू ते रद्द करू असेही त्यांनी सांगितले.
जाणून घ्या दंड कसा आकारला जातो
राज्यात सध्या आरटीओच्या नियमानुसार, वाहतुकीच्या गुन्ह्यानुसार दंडाची तरतूद आहे. मात्र यामध्ये महत्वाचे म्हणजे गुन्ह्याची पुरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होते. तसेच वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्याला १५ दिवसांच्या आत ई-चलन दंड भरावा लागतो तर १६ व्या दिवसापासून पैसे देण्यास विलंब केल्याबद्दल प्रतिदिन १० रुपये दंड आकारला जातो.
0 Comments