सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भारत नाना भालके यांचे निधनमंगळवेढा/प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (ता.२७) मध्यरात्री निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. भारत नाना भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती.  शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूर तालुक्यातील  गोरगरिबांचा  व कष्टकरी वर्गांचा पांडुरंग गेल्याची भावना  व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी बा विठ्ठलाकडे प्रार्थना केली. सोशल मीडियातून त्यांच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करण्यात आला होता. अखेर, भारत नानांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. भारत भालके यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती घेतली. त्याचवेळी रूपाताई चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली.

आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी झाली. पंढरपुरातूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉलच्यासमोर उडालेली दिसत आहे. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त झळकल्याने सोलापूर जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयाबाहेरच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारत नाना भालके यांचा राजकीय प्रवास तालुका 
स्तरावरील राजकारण ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बारा वर्षे आमदारकी असा राहिला. भारत नाना भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भारत भालके हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते त्यांनी १९९२ बाली आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तालुक्यातील राजकारणापासून चालू केली होती विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय प्रवास सुरु केला. २००२ साली विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन पदी निवड झाली. विठ्ठल साखर कारखान्याचे भारत नाना भालके अठरा वर्ष चेअरमनपदी राहिले. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून आमदार की निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा त्यवेळी पराभव झाला होता २००९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून विधानसभेची विधानसभेची पायरी चढले होते,  मोहितेे पाटलांसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता २०१४ साली पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा असताना ही भाजप उमेदवार प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता.  २०१९ आली पांडुरंग परिवाराची ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा यांचा दारुण पराभव तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली होती. ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्यानंतर भारत नाना भालके यांनी जास्त काळ आमदारकी भूषवली. 

राजकारणाच्या या आखाड्यात राजकारणातील पैलवान म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांनी पुढील उमेदवाराला आस्मान दाखवले. एवढेच नाही तर विजयाची हॅट्रिक साधत शरद पवार साहेबांचा पठ्या म्हणून बिरूद मिळवले.भारत नाना भालके आपल्या वक्तृत्व व रांगडी भाषेमुळे चांगलेच लोकप्रिय होते यामुळे भारत नाना भालके यांचे नेतृत्व बहरत गेले. वेळोवेळी विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाणी प्रश्नांचा केलेला पाठपुरावा, इतर विकासाच्या मुद्द्यावरून मतं मिळविण्यात ते यशस्वी ठरले.मराठा आरक्षण आंदोलनावेळी भारत भालकेंनी मराठा समाजाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येण्यासही विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा त्यांना निश्चितच फायदा झाला. 

पांडुरंग परिवारा विरुद्ध लढणारा पैलवान
पांडुरंग परिवाराची ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी २५ वर्ष पंढरपूर चे आमदार म्हणून काम केले, मात्र २००९ झाली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांना आमदारकीचे तिकीट दिल्यानंतर सुधाकरपंत परिचारक यांनी माघार घेतली होती, त्यावेळचे अपक्ष आमदार भारत नाना भालके मोठ्या मताधिक्क्याने विजय झाले होते. भारत नाना भालके यांनी परिचारक गटा विरुद्ध ग्रामपंचायत पासून ते आमदारकी पर्यंत आपला राजकीय संघर्ष केला २०१४ साली प्रशांत परिचारक व २०१९साली सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करून त्यांच्या राजकीय वर्चस्वाला लगाम लावण्याचा प्रयत्न भारत नाना भालके यांनी केली.

पंढरपुरातील दिग्गज नेते ठरले करोना बळी

गेल्या आठ महिन्यापासून करुणा संसर्गामुळे पंढरपूर पंढरपुरातील राजकारणातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांचा करुणा मुळे मृत्यू झाला. त्यात ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते राजू बापू पाटील सावरकर, साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात, आणि भारत नाना भालके यांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. आशा दिग्गज नेत्यांचा करणामुळे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments