प्रेम संबंधास नकार; नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजर महिलेने दिली, मुंबई महानगरपालिकेतील इंजिनियर ला मारण्याची सुपारी....मुंबई पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला अटक केली आहे. या अटकेचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिला असिस्टंट मॅनेजरचे मुंबई महानगरपालिकामध्ये काम करत असलेल्या एका सब-इंजिनीअरवर प्रेम होते. मात्र या इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग धरून या असिस्टंट मॅनेजरनं चक्क इंजिनिअरला ठार मारण्यासाठी सुपारी दिली.

ही महिला मुंबईतील नामांकित बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, तर ज्याची सुपारी दिली होती, ती व्यक्ती पालिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर ही सुपारी घेणारा तरुण हा बीएससी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. महिला असिस्टंट मॅनेजर आणि या इंजिनिअरचे अफेअर होते. मात्र इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला हे असाह्य झाल्यामुळे या महिलेनं त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला.

ओडिशाचा रहिवासी बीएससीचा विद्यार्थी विजय प्रधान याला इंजिनिअरला मारण्यासाठी १ लाखांची सुपारी देण्यात आली होती. रविवारी आरोपी महिला आणि मारेकरी एकमेकांना भेटले आणि प्लॅन करून घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी या दोघांना घटनास्थळी अटक केली आणि या इंजिनिअरचे प्राण वाचवले. 

Post a Comment

0 Comments