गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक


कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरु आहे.भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला NCB ने आधी समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली.
(Advertise)

भारती सिंहच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.
(Advertise)

दरम्यान, एनसीबीने आज खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे १५ बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि ४० ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आलं.

Post a Comment

0 Comments