अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ, खास मित्राला एनसीबीकडून अटक


 अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक लवकरच अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी करणार आहे. पण, त्याआधी त्याच्या मित्राला एनसीबीने  अटक केली आहे.
(Advertise)
एनसीबीने आज सकाळी अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे. 
(Advertise)
पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स  याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.
(Advertise)

त्याआधी गुरुवारी एनसीबीने अर्जुन रामपालला समन्स पाठवला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी त्याला हजर राहावे लागणार आहे.  काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केली.

Post a Comment

0 Comments