"खडसेंच्या तक्रारीमुळे गिरीश महाजन अडचणीत"


राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. त्यात आणखी एक हादरा म्हणजे, जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

(Advertise)

बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही  कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात एकच रर्चा रंगली आहे.
(Advertise)

या तक्रारीमुळे एकनाथ खडसेंनकडून गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरंतर, २०१७ पासून खडसेंनी दिल्लीकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र, भाजपामध्ये फडणवीस आणि खडसे राजकीय वैर असल्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता भाजपलासोडचिट्ठी देत खडसेंनी पुन्हा एकदा तक्रार करत गिरीश महाजन यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments