बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणारा पकडलेला टिपर बार्शी तहसील कार्यालयातून पळवून नेला

बार्शी/प्रतिनिधी:

बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणारा पकडलेला टिप्पर पळवून नेल्याने बार्शी तहसील कार्यालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,

अधिक माहिती अशी की टिप्पर नंबर एम एच १३ ए एक्स २७०३ बार्शी गोडाऊनमध्ये लावण्यात आला होता, मात्र संबंधित चालकांनी मोठ्या शिताफीने सदरचा टिप्पर पळवून नेला असल्याची घटना घडली आहे.
(Advertise)

याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणारा पकडलेला टिप्पर पळून गेला असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बाशीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments