यशोमती ठाकूर यांच्याकडून अमृता फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक


अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे.
(Advertise)

 मात्र एकीकडे अमृता यांनी या गाण्याला पसंती मिळत असल्याचं म्हटलेलं असतानाच या गाण्याची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. असं असलं तरी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गाण्याचा आशय चांगला असल्याचं म्हणत त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.
(Advertise)

“सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचं गाणं शेअर करत कौतुक केलं.


Post a Comment

0 Comments