‘मी टू’ ची मोहीम छेडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन !काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये मीटू मूव्हमेंट मोहीम सुरू करणारी तनुश्री दत्ता चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. तनुश्रीने इन्स्टाग्रामवर एक लांब पोस्ट लिहिली असून तिच्या निर्णयामागील कारण आणि ती तिच्या आयटी पार्श्वभूमीवर कलेवर आपले प्रेम का दाखवित आहे हे स्पष्ट करते.

तनुश्रीने सांगितले कि लॉस एंजेलिसमध्ये आयटीमध्ये नोकरी करत असल्याच्या बातम्या येत होत्या पण मी मी प्रत्यक्षात आयटी प्रशिक्षण घेत होते आणि अमेरिकन सरकारच्या संरक्षण क्षेत्रात मला नोकरीची मोठी संधी मिळाली. हे एक अतिशय सन्माननीय काम होते, कारण माझ्यामध्ये आवश्यक असलेली शिस्त, सार्वभौमत्व आणि दृढनिश्चय लष्करी पार्श्वभूमीवर आहे, परंतु मी ते स्वीकारले नाही, कारण मला पुन्हा एकदा माझ्या चित्रपटसृष्टीतील कलेसोबत जायचे होते.

डिफेन्समधील हि नोकरी नेवाडा येथे होती. कोरोनाच्या महामारीनंतर मला लॉस एंजेलिस / न्यूयॉर्क येथे हलवावे लागतेअसते आणि तीन वर्षे अमेरिकेबाहेर जाऊ दिले नसते . आणखीन मला तीन वर्षांसाठी कराबद्ध व्हावे लागले असते कारण संरक्षण प्रकल्पांत सुरक्षा नियम कठोर आहेत. मी एक कलाकार आहे, पण काही वाईट मनुष्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे माझा कलेचा मार्ग गमावला लागला होता . आणि म्हणूनच भारतात मी परत बॉलीवूड मध्ये मला आवडत्या प्रोजेक्टवर काम करेन .

Post a Comment

0 Comments