सोलापूरच्या विकासासाठी त्वरित विमानसेवा सुरू होणे आवश्यक....


सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या विमानसेवे विषयीच्या चर्चासत्रात नागरिकांनी व्यक्त केली खंत

सोलापूर डेव्हलपमेंट फोरम द्वारा हॉटेल प्रथम येथे आयोजित सोलापूर विमानसेवेबाबतच्या चर्चासत्रात सोलापूरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सहभाग नोंदवला. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने विमानसेवा त्वरित सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे असा सुर सर्वांनी व्यक्त केला. विमानसेवा सुरू झाल्यावर सोलापूरच्या अर्थकारणाला गती प्राप्त होऊन सोलापूरचा झपाट्याने सकारात्मक कायापालट होईल असे मत गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केले.
(Advertise)

बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास अजुन भरपुर अवधी असून सर्व सोयी सुविधांनी आधुनिक असे होटगी रोड विमानतळावरुन केंद्र सरकारच्या उडान योजने अंतर्गत विमानसेवा त्वरित सुरू करावी असा सुर चर्चासत्रात उमटला. विमानसेवेस अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह.साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी विषयी जिल्हा प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी आणि सोलापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा असे सोलापूरातील तज्ञ मंडळींनी आशावाद व्यक्त केला.
(Advertise)

सोलापूरच्या सर्व उद्योगांना चालना मिळण्यासाठी आणि सोलापूरात भरिव गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने सोलापूरची विमानसेवा त्वरित सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, त्याकरिता सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रयत्न करावा असा एकत्रित सुर चर्चासत्रात उमटला. सोलापूर डेव्हलपमेंट फोरम द्वारा आयोजित सदर चर्चासत्रात फोरमचे सदस्य केतनभाई शहा, संजय थोबडे, मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव, योगीन गुर्जर, श्रीनिवास वैद्य, आनंद पाटील, भक्ती जाधव यांच्यासह सोलापूरातील विविध संस्था आणि संघटनेचे १५६ पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनदी लेखापाल श्रीनिवास वैद्य यांनी केले, सूत्रसंचालन केतनभाई शहा यांनी केले तर आभार अॅड. प्रमोद शहा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments