अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण योगी सरकारचा निर्णय


उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ’ असं असणार आहे.
(Advertise)

 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (२४ नोव्हेंबर) कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या विमानतळाचं काम सुरु असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(Advertise)

अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. बुद्धांची जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असलेल्या कुशीनगर आणि जेवरमध्ये देखील अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे.

Post a Comment

0 Comments