सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळ जवळ रुग्णवाहिकेला अपघात, तीन जण ठार


पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेला मोहोळ येथे भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार झालेत. 
(Advertise)
एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना मालवाहतूक ट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिली.


(Advertise)
मोहोळ शहरातील कन्या प्रशालेसमोर हा अपघात झाला. रुग्णवाहिकेत १७ जण होते. या अपघात चालकासह तिघांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेने धावत्या ट्रकला धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा झाला आहे.
(Advertise)
 जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णवाहिकेतून एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह गावी घेऊन चालले होते. मात्र, काळाने त्यांच्यावरच घाला घातला.

 

Post a Comment

0 Comments