चंदगड येथे संविधान दिन साजरा...


चंदगड/प्रतिनिधी:

भारतीय राज्यघटना निर्मितीमागील इतिहास आणि वास्तव यावर सविस्तर विवेचन आणि मांडणी करत संविधानाचे महत्त्व प्रा.के.डी.मंत्रेशी यांनी पटवून दिले.

संविधान दिनाच्या निमित्ताने चंदगड येथे आयोजित संविधान सभेत प्रमुख वक्ते म्हणून प्रा.के.डी.मंत्रेशी बोलत होते.
(Advertise)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध वकील रवि रेडेकर हे होते.
सध्याची संविधानाची चाललेली मोडतोड आणि त्यादृष्टीने संविधानाच्या मुल्यांची होणारी पायमल्ली लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे,असं ते म्हणाले.

यावेळी प्रा.ए.डी.कांबळे सर,पत्रकार कृष्णा कांबळे,शांतीरत्न महादेव कांबळे(आण्णा),नगरसेविका  सौ.नेत्रदीपा कांबळे,प्रा.जाधव सर,राजु नाईक सर आणि मान्यवर उपस्थित होते.
(Advertise)

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात विद्रोही कवी एस.टी.धम्मदिक्षीत यांनी संविधान नसेल तर काय होईल...?या  विषयावर कविता सादर केली.
याचबरोबर चंदगड तालुक्यातील नवोदीत कवी आणि पत्रकार रजनी कांबळे यांनी बाबासाहेबांना उद्देशून लिहालेल्या पत्राचं वाचन करुन सध्या देशपातळीवर चाललेल्या भयानक वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकला.

संविधान जनजागृती आणि संविधान बचाव हा मुख्य उद्देश समोर ठेवून आयोजित केलेल्या या सभेच्या निमित्ताने तालुका चळवळीतील दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.डी.कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments