कॉलेजमधील मुलीची छेड काढली म्हणून त्याच्या मित्राकडून तरुणांला बेदम मारहाणीत युवकांचा मृत्यूएका २९ वर्षीच्या व्यक्तीने छेड काढल्याचे मुलीने आपल्या मित्राला सांगितले. त्यावर मित्राने आपल्या इतर मित्रांना घेऊन छेड काढलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. ही मारहाण जिव्हारी लागल्याने त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पाच तरुणांना रविवारी अटक करण्यात आली आहे. हे पाचही तरुण कॉलेजमध्ये शिकणारे आहेत.

(Advertise)

 मुलगी आपल्या घरी जात असताना मृत मयुर गिरधारी जोशी यांनी त्या मुलीवर काही टिप्पणी केली. या आधी देखील असं कृत्य मयुर जोशीकडून (वय २९) करण्यात आला होतं, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली. या गोष्टीला कंटाळून मुलीने तिचा मित्र मानस मोरे (वय १९) याला फोन करुन सांगितली.

(Advertise)

मानसने फोन करून आपल्या इतर मित्रांना बोलवून मयुर जोशी याला मारहाण सुरू केली. मयुर जोशी जमिनीवर पडल्यानंतर सर्व मुलांनी घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मयुर जोशीच्या पोटात अतिशय वेदना होत होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
(Advertise)

वाकोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाचही मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments