शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. जिच्यात क्षमता आहे ती स्त्री मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
0 Comments