"लोकवार्ता न्यूज पोर्टल व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदारांना मतदान करण्यासाठी आव्हान"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

उद्या मंगळवार दि.१ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील विविध विभागातील शिक्षक  व पदवीधर मतदारसंघातील आमदार  निवडणूकीसाठी  मतदान होणार आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी मतदाराकडून मिळणारा अल्प प्रतिसादामुळे लोकवार्ता डिजिटल न्युज पोर्टल व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सर्व मतदार बंधू-भगिनींना मतदान करण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

शिक्षक व पदवीधर निवडणुक म्हटलं की यामध्ये सुशिक्षित पदवीधारक घटक  व सभ्य, प्रामाणिकपणे कर्तव्य बजाविणारा शिक्षक वर्ग डोळ्यासमोर येतो.या घटकांना स्वतःचा न्याय-हक्कासाठी व विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी मतदानाद्वारे आपले प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार भारतीय संविधानामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.

खरं म्हणजे या  मतदार राजाला शिक्षक व पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या आमदाराकडून  शैक्षणिक व इतर कोणत्याही मागणीसाठी  योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना भ्रमनिरासाला सामोरे जावे लागते आहे. उलटपक्षी हे निवडून आलेले आमदार  कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या मागे राहून सुरात सूर मिसळतात त्याचा परिणाम म्हणून  या निवडणुकी म्हणजे औपचारिकतेचा  एक भाग आहे असे वाटते. आपण मतदान न केल्याने काय फरक पडणार आहे अशा प्रकारची एक मानसिकता तयार होते आणि याच मानसिकतेचा फायदा हे तथाकथित उमेदवार विशिष्ट मतदार नोंदणी करून त्या अनुषंगाने निवडणुकीची रणनीती आखतात व ते यशस्वी होतात. परंतु मतदार राजानो अशा प्रकारचा नकारात्मक विचार न करता आपण सर्वांनी मतदान केलो तर संबंधित आमदारांची निवडून येण्याची रणनीती कोलमडून पडते. तसेच आपल्याला हवा असणाऱ्या योग्य उमेदवाराला निवडून आणता येते.  आपल्या मतदानामुळे निवडून येण्याच्या रणनीती व तंत्राला आळा बसतो त्यामुळे मतदार राजाचे महत्व त्यासंबंधीत पक्षाच्या उमेदवाराला कळते.

त्याचबरोबर आपल्याला हवा असणारा उमेदवार निवडून आणता येतो.त्यामुळे मतदार राजाचे अस्तित्व व महत्व टिकवून ठेवावयाचे असेल व लोकशाही प्रगल्भ करावयाची असेल तर 'चला मतदान करूया आणि योग्य उमेदवार निवडून आणूया' अशा प्रकारचा सकारात्मक विचार आपण सर्वांनी करून मतदान करूया असे आव्हान लोकवार्ता डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अर्जुन गोडगे व एन. एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींनी मतदान करून लोकशाही बळकट करावी.

Post a Comment

0 Comments