आजपर्यंत शिवसेनेकडून सर्वांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम- मनसेची शिवसेनेवर टीका“मनसेनं आतापर्यंत जे काही केलं ते उघडपणे केलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनाही उघडपणे पाठिंबा दिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान देशहिताची भूमिका मांडली. 
(Advertise)

आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकासोबत आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही. आम्हाला तशी गरज पडली नाही. शिवसेनेनं मराठी माणसांबोत हिंदूंसोबत दगाबाजी केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. 
(Advertise)

२०१७ मध्ये महानगरपालिकेची स्वतंत्र निवडणूक लढवून त्यांनी त्याची चाचपणीही केली. त्यावेळी मुख्यमंत्री तर सोडा महापौरही निवडून आणू शकत नाही हे त्यांना समजलं. त्यावेळी मराठी माणसांसोबत आणि हिंदूंसोबत दगाबाजी करण्याचं काम शिवसेनेनं केलं असं देशपांडे म्हणाले. 
(Advertise)
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची म्हणजेच आताची जी शिवसेना आहे ती दगाबाज शिवसेना असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला.
(Advertise)

भाजपासोबत जाण्याचा निर्णय अद्याप राज ठाकरे यांनी घेतला नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या मनात भीती आहे. त्यांनी मनसेसोबत कायम दगाबाजी केली. २०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं आमच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. 

Post a Comment

0 Comments