करमाळा येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार जाहीर



सालाबादप्रमाणे महात्मा फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कणसे यांनी दिली.
            (Advertise)     
यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन न करता पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा यांना सदर पुरस्कार हे वैयक्तिक स्वरूपात दिले जाणार आहेत. गेल्या ७ वर्षापासून सदर पुरस्कार हे अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिष्यवृत्ती मार्गदर्शक, पदवीधर, मुख्याध्यापक, नगरपालिका,  माध्यमिक व महाविद्यालयीन विभागातील गुणवंत शिक्षकांना तसेच तालुक्यातील उपक्रमशील द्विशिक्षकी व बहूशिक्षकी शाळांना दिले जातात. याबरोबरच यावर्षी ऑनलाइन तंत्रस्नेही मार्गदर्शक शिक्षकांना देखील सदर पुरस्कार दिले जाणार आहेत.
          (Advertise)       

 यावेळी प्रवीण शिंदे, चंद्रकांत वीर, शहाजी रंदवे, नवनाथ मस्कर, संतोष शितोळे, संतोष माने, अशोक कणसे, अरुण चौगुले, अजित कणसे, शरद पायघन, सुनिल पवार, महेश निकत, सुधिर माने, लहू चव्हाण, संपत नलवडे, दादासाहेब माळी,  दत्तात्रय जाधव, विजय बाबर, सोमनाथ पाटील, पोपट पाटील, विकास माळी, उमराव वीर, अंकुश सुरवसे, शरद झिंजाडे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षक

विजया शिंदे/संगीता भोंडवे  (जगदाळेवस्ती,वीट), सुनिल जाधव (भोसे), विशाल शहाणे (कोर्टी), जालिंदर हराळे (हिवरे), रवींद्र आगलावे (मारकडवस्ती, चिखलठाण), सुवर्णा नरवडे  (खातगाव-1), माधुरी चव्हाण (केम), रोहिणी वीर  (कविटगाव), वैशाली महाजन (रावगाव), सतिश चिंदे  (भिवरवाडी), महावीर वाघमारे (वांगी-1), महादेव यादव (देवळाली), सुवर्णा वेळापुरे (न.पा.मुली-1), अर्जुन जगदाळे (कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा), प्रा. डॉ. प्रवीण देशमुख (प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा)

उपक्रमशील शाळा

१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरपडोह
२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखलठाण-२

Post a Comment

0 Comments