बीड अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीला अटक


बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात २२ वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रियकरांनं केला त्यात पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेयसीला जाळल्यानंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा केला होता, अखेर नांदेड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
(Advertise)

पीडित तरुणी शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही दिवाळीनिमित्त पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते. 
(Advertise)

गावी परतत असताना पहाटे ३ च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता .
(Advertise)

आरोपीला कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’त खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली आहे. या प्रकरणी मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं.

Post a Comment

0 Comments