भारत बांग्लादेशला देणार तीन कोटी कोरोना प्रतिबंधक लसी


भारत बांगलादेशला ३ कोटी कोरोनाप्रतिबंधक लसीचे डोस प्रदान करणार आहे. भारत, बांगलादेश, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बेक्सिमको फार्मास्युटिकल्स यांच्यामध्ये लसपुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.
(Advertise)

 ब्रिटीश औषध निर्माता अ‍ॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लसीच्या ३ कोटी डोसच्या खरेदीसाठी बांगलादेशने या लसीचे उत्पादक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे.
(Advertise)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी बोलताना असे म्हटले होते की, सर्व देशांना कोरोनाविरोधातील लढाईत एकत्र यावे लागेल. कोरोना लसीचा पुरवठा करून भारताने आपल्या मानवतावादी दृष्टिकोनाचे उदाहरण घालून दिले आहे. बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने हा नवीन अध्याय लिहिला जात आहे.
(Advertise)

कोरोनाप्रतिबंधक लस तयार होईल, तेव्हा सीरम इन्स्टिट्यूट पहिल्या टप्प्यात बांगलादेशला ३ कोटी डोस देणार आहे, असे बांगलादेशचे आरोग्यमंत्री जाहिद मलिक यांनी ढाका येथे करार झाल्यानंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की बांगलादेशातील औषध निर्माता बेक्सिमको फार्मास्युटिकल्समार्फत दरमहा ठराविक संख्येने लस खरेदी केल्या जातील.
(Advertise)

बांगलादेश व्यतिरिक्त म्यानमार, कतार, भूतान या देशांनाही भारताकडून लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments