राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवलं आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलाय.
माननीय शरद पवार हे गेल्या ४० वर्षांपासून राजकीय दौरे करत आहेत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात दौरा केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असा दावा प्रसाद लाड यांनी केला.
खडसे चे अस्तित्व पूर्णपणे संपलेले आहे, अस्तित्वहीन झाल्यामुळे स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केलीये.
0 Comments