देशात पहिल्यांदाच… ‘या’ राज्यात फळं आणि भाज्यांनाही मिळणार हमीभाव



केरळ सरकारने फळं आणि भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइज) निश्चित केली आहे. अशाप्रकारे भाज्यांसाठी एमएसपी निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. केरळमधील शेतकऱ्यांना सरकारकडून भाज्यांसाठी देण्यात येणारे आधारभूत मूल्य हे उत्पादन शुल्काच्या २० टक्के अधिक असणार आहे. .

एकूण १६ भाज्यांवर हमीभाव, केरळमधील शेतकऱ्यांना १६ भाज्यांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला असून या निर्णयाचा केरळमधील शेतकरींना फायदा होईल. केरळ सरकारने खाण्यापिण्यासंदर्भातील एकूण २१ गोष्टींचे आधारभूत मूल्य निश्चित केलं आहे. राज्यामध्ये केळ्यासाठी ३० रुपये प्रती किलो, अननसासाठी १५ रुपये प्रती किलो, तापियोकासाठी १२ रुपये प्रती किलो आणि टोमॅटोसाठी आठ रुपये प्रती किलो हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments