रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वर पलटवार; गेली २५ वर्ष ह्या मतदारसंघात भाजपचे आमदार होते....भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. पवार साहेबांच्या खांद्यावरन उतारा आणि मग तुम्हाला कळलं की तुम्ही किती खुजे आहात असा घणाघात पडळकर यांनी केला होता. 

फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. 

माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते.

Post a Comment

0 Comments