इको फ्रेंडली प्लास्टिक च्या वापरासाठी जनजागृती आवश्यक: अभिजीत पाटील

आपल्या रोजच्या जीवनावश्यक वापरामध्ये प्लास्टिक चा वापर वाढला आहे. त्यामुळे आरोग्याची तसेच पर्यावरणाची सुद्धा हानी होऊ लागली आहे. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अभ्यासानुसार, २०२० पर्यंत वापराच्या प्लास्टिक चे मार्केट २२ मिलीयन टन वाढणार आहे. या वाढलेल्या उत्पादना बरोबरच त्याचा पुनर्वापरा चा प्रश्न ही वाढणार आहे.  दररोज भारतामधे २६००० टन प्लास्टिक वेस्ट तयार होते. यामध्ये आपला जगामध्ये १५वा क्रमांक आहे. 
या वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्या साठी नेचर केअर ईनोव्हेशन सर्व्हीस प्रा.लि. इको फ्रेंडली प्लास्टिक घेऊन आले आहे. जे एक आठवडा ते १५० दिवसात स्वतः विघटन पावते. या उदघाटन समारंभ वेळी अतिथी म्हणून आयुक्त नितीन कपडणीस, रोट्रॅक्ट चे अध्यक्ष अभिजीत पाटील, शेतकरी संघटनेचे सौरभ शेट्टी होते. या प्रसंगी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, प्लास्टिक चा वापर दरवर्षी वाढतोय तसा त्या कचऱ्याचे प्रमाण ही वाढत आहे. त्यासाठी रोजच्या वापरातील प्लास्टिक ला आपल्याकडे इको फ्रेंडली प्लास्टिक पर्याय आहे. लोकांमध्ये याच्या वापराबाबत जागृती करणे गरजेचे आहे आणि या जनजागृतीसाठी लागेल ती मदत रोट्रॅक्ट तर्फे करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या प्रसंगी नेचर केअर ईनोव्हेशन सर्व्हीस प्रा.लि. चे ऋषी पाटील, विनायक जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments