धक्कादायक! मुंबईत कोव्हिड रुग्णालयाला आग ; एकाचा मृत्यू


 मुंबईतील मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात गेले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. अॅपेक्स हॉस्पिटमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताचा खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीनं अन्य रुग्णांना वेळीच सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments