जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे भीमेला पुर, एक आठवड्यात ४ लाख क्यूसेक विसर्ग भीमा पत्रात



पंढरपूर/प्रतिनिधी:

अतिवृष्टीचा इशारा असतानाही जलसंपदा विभागाने पूर्ण भरलेल्या उजनी धरणातून योग्यवेळी पुरेशा क्षमतेने पाणी सोडण्याबाबत उदासीनता दाखवली. सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. १४) रोजी रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशीही धरणाची पाणीपातळी १११ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होती. त्यात १३ ऑक्टबर रात्री उजनी धरण क्षेत्रात २५० मी. मी. पाऊसाची नोंद झाली.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे पुणे आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे साहजिकच सर्व अतिरिक्त पाणी धरणातून सोडून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्यायच उरला नाही. परिणामी एकाच दिवशी दहा हजारावरून सव्वादोन लाख क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवावा लागला. त्यामुळे उजनी आणि वीर धारणातून कोणतीही पूर्व कल्पनेशिवाय ४ लाख क्यूसेक विसर्ग सोडण्यत आला.

   १२ ऑक्टोबरपासून सोलापूर-पुणे पट्टय़ात पाऊस सुरूच होता. उजनी धरणही पूर्णपणे भरलेले होते. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा आल्यानंतर व प्रत्यक्ष जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतरही १२, १३ ऑक्टोबरला व नंतर १४ ऑक्टोबरच्या दुपापर्यंत कमाल २० हजार क्युसेक पाणी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते. १४ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास ४० हजार क्युसेक, सव्वाचारच्या सुमारास ५० हजार क्युसेक, पाचच्या सुमारास ८० हजार क्युसेक असे करत मध्यरात्रीपर्यंत सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच दुपारी तीन ते रात्री १२ या ९ तासांच्या कालावधीत सुमारे दोन लाख क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 

जलसंपदा विभागाकडे जिल्ह्यात शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झालेले जवळपास दहा प्रकल्प, भीमा, सीना, नीरा, माण, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांच्या पात्रातून उपसा सिंचनाद्वारे भिजणारे क्षेत्र असा संपूर्ण जिल्हा उजनी प्रकल्पाचाच भाग आहे. 

  १४ ऑक्टोबरला तो वाढवण्यास सुरुवात झाली आणि तो दोन- सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत गेला. जलसंपदा विभागाने या संदर्भातील तपशीलवार माहिती जाहीर करावी. पूर टाळता आला नसता का? त्याची तीव्रता कमी करता आली नसती का याबद्दल चर्चा झाली पाहिजे.

  तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र उजनी धरणाच्या व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. अजूनही नदीकाठच्या गावांत लोक अडकले होते तर  १६ हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आला. जिल्ह्यात १४ जणांचा मुत्यु झाला आहे. एका रात्रीत आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई, डाळिंब यासह इतर अनेक पिके वाहून गेली. वर्षभर कष्टानं जोपासलेली पिके डोळ्या देखीत वाहून गेल्याने शेतकऱ्याचं काळीज ही पुराच्या पाण्याने करपून गेले आहे. पंढरपूर तालुक्‍यातील ९५ गावातील सुमारे ३० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments