करीना ने साराला विचारला सवाल....कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस का? सैफ अली खान आणि तिची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान नुकतीच करीना कपूर खानच्या ‘शो व्हॉट वुमेन व्हांट’ शोमध्ये दिसली.

मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने सारा अली खानला विचारले की, कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस का? 
करीनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना साराचा गोंधळ उडाला. प्रश्नाचे उत्तर देताना साराने सांगितले की मी कधीच वन नाइट स्टॅण्ड केले नाही. साराने हे उत्तर दिल्यांनतर करीनाने देखील निश्वास घेतला. साराच्या सहभागामुळे या शोची रंगत आणखीनच वाढली.

दरम्यान, साराला या शोमध्ये करीनाने बरेच खासगी प्रश्न विचारले होते. करीनाने सारा अली खानला विचारले की तू कधी कोणाला नॉटी मेसेज पाठवले आहेस का?, या प्रश्नासोबत करीना म्हणाली की तुझे वडीलांनी ऐकू नये म्हणून मी विचारत नाही. मात्र प्रश्नांवर थोडा विचार करून साराने लाजत उत्तर हो असे उत्तर दिले.

Post a Comment

0 Comments