पिंपळनेर गावांत प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप तळेकर व सागर पवार यांचा सत्कारकुर्डूवाडी/ प्रतिनिधी;
 
पिंपळनेर तालुका माढा या गावी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर व तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार यांचा  सत्कार समारंभ साजरा करण्यात आला.
  
 माढा व करमाळा तालुक्यातील  यांच्या काही समस्या असतील त्या समस्या जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या दरबारी मांडून त्या सर्व समस्यांचे निवारण प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल असे यावेळी नूतन संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार यांनी सांगितले.
   
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संदीप तळेकर यांनी माढा व करमाळा तालुक्यातील सर्व वंचित घटकांना प्रहार'च्या माध्यमातून प्रत्येकांच्या समस्या माझ्या पातळीवर सोडवण्याचा निस्वार्थपणे प्रयत्न करीन आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रहार संघटनेच्या माध्यमातून काम करेन असे सांगितले.
   
यावेळी पिंपळनेर येथील उत्तम यम्पुरे अण्णा शिंदे, सागर बंडगर, करण शिंदे, भैया शिंदे ,उद्धव चव्हाण ,विशाल चव्हाण ,विक्रम धोत्रे, भैया धोत्रे ,पणती शिंदे , व पिंपळनेर  येथील जय बजरंग तरूण मित्रमंडळाचे  सर्व कार्यकर्तेआदी प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    

Post a Comment

0 Comments