अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. सध्या दिशा चर्चेत आहे ती सलमान खानमुळे.
होय, सलमान खान खूपच गोड आहे, असे दिशाने म्हटले आहे. इतकेच नाही क्षणाचाही विचार न करता तिने सलमानला होकार दिला आहे.
आता होकार कशासाठी? तर तुम्ही समजताय त्यासाठी नक्कीच नाही. हा होकार आहे, सलमानच्या आगामी प्रोजेक्टसाठी.
होय, ‘राधे’ आगामी सिनेमात माझ्यासोबत काम करशील का? असे सलमानने विचारले आणि दिशाने क्षणभरही विचार न करता अगदी थेट होकार दिला.
एका ताज्या मुलाखतीत, दिशाने याबद्दल सांगितले. सलमान खूपच गोड आहे. त्याच्यासोबत काम करणे एक मस्त अनुभव असतो. त्याच्याकडून खूप काही शिकता येते. त्यामुळेच त्याने ‘राधे’साठी विचारताच मी तडक हो म्हटले, असे दिशा या मुलाखतीत म्हणाली.
एकीकडे सलमानसोबत पुन्हा काम करणार मिळणार हा आनंद होताच. याशिवाय प्रभुदेवांचा हा सिनेमा आहे म्हटल्यावर माझा आनंद गगणात मावेनासा झाला होता, असेही दिशा म्हणाली.
राधे या सिनेमात सलमान व दिशा रोमान्स करताना दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटींग खोळंबले होते. पण तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटींग पुन्हा सुरु झाली आहे.
सलमानसोबतचा दिशाचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी ‘भारत’ या सिनेमात दिशा सलमानसोबत झळकली होती. या सिनेमात तिची भूमिका छोटी होती. पण सलमानसोबत काम करायला मिळण्याच्या आनंदात ही भूमिका छोटी असूनही तिने स्वीकारली होती.
‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
0 Comments