चीनला जबरदस्त झटका मोदी सरकारचा एक डिजिटल स्ट्राईक; ‘PUBG’सह ११८ अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे आज  चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राईक करण्यात आली आहे. आज हा निर्णय घेऊन केंद्राने आज ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये PUBG या मोबाईल गेमचा देखील समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवरील तणावामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. अशातच आज केंद्र सरकारतर्फे चिनी बनावटीच्या ११८ अ‍ॅप्सवर बंदी लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वीही भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी लादली होती. चीनला मोदी सरकारने जबरदस्त झटका दिल्याचे मानले जाते.

{ 📢 जाहिरात:-


अतिशय कमी आणि किफायतशीर किमतीमध्ये मिळवा पल्स ऑक्सिमीटर, वाफ घेण्याचे मशीन व थर्मामीटर. अत्यंत सुरक्षित आणि हाताळण्यास सोपे असलेली ही उपकरणे आपल्यासाठी माफक दरात.
संपर्क:- ९७६६२३२०२४ "📢  }

देशाच्या हितासाठी आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. ‘या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.  

Post a Comment

0 Comments