सोलापूर जिल्हा बँकेकडून १ ऑक्टोबरपर्यंत पीक कर्जस मुद्दत वाढत


बार्शी/प्रतिनिधी;

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने १ ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप मुद्दत वाढत देण्यात आली आहे. सध्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ज्या शेतकरी सभासदांनी अल्पमुदत पीक कर्जाची बाकी पूर्णता भरली आहे त्याच सभासदांना पुनश्‍च पीक कर्ज वाटप करण्याचे धोरण बॅंकेने स्वीकारले आहे. या धोरणानुसार १ ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने वसूल करतात अशा संस्थेमार्फत  मुदती कर्ज वाटपाचे धोरण राबविले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार २६४ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून. त्यापैकी नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास ३३४ संस्था पात्र आहेत. उर्वरित संस्थानी बॅंक पातळीवर १०० टक्के वसुली व संस्था पातळीवर ५० टक्के वसुली केल्यास त्याही संस्था नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास पात्र होणार आहेत. 

जिल्हा बँक कर्ज वाटपाच्या नवीन धोरणांतर्गत ज्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची ३० जून २०२० अखेर बॅंक पातळीवरील कर्जाची वसुली शंभर टक्के व संस्था पातळीवरील सभासद कर्जाची वसुली 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे अशा संस्था पात्र ठरविण्यात आल्या आहेत.

तफावतीमध्ये व नफ्यामध्ये असलेल्या सोसायट्यांच्या सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. नवीन धोरणानुसार जिरायती पिकासाठी अल्पमुदत कमाल कर्ज मर्यादा २५ हजार रुपये, संपूर्ण बागायती क्षेत्रासाठी अल्पमुदत कमाल कर्जाची मर्यादा एक लाख रुपये, जिरायत व बागायत पीक कर्जासाठी एकत्रित कमाल कर्ज मर्यादा एक लाख रुपये इतकी असणार आहे.

Post a Comment

0 Comments