बार्शी पंचायत समिती करणार; आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतचा सन्मान...



बार्शी/ प्रतिनिधी;

ग्रामीण भागात हे कोरोनाचा कहर वाढतच आहे, अशा काळात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत योग्य नियोजन करून कोरोना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बार्शी पंचायत समितीच्या मासिक सभेत बार्शी तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन ग्रामपंचायती यांना सन्मानित करण्यात ठराव मंजूर केल्याची माहिती सभापती अनिल डिसले यांनी दिली.

प्रभावी यंत्रणा राबवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रथम क्रमांक दहा हजाराचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक साडेसात हजाराचे, पारितोषिक तृतीय क्रमांक पाच हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

सभापती अनिल डिसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती, सदस्य सुंदरराव जगदाळे यांनी हा ठराव मांडला. त्याला अनुमोदन अविनाश मांजरे यांनी दिले अशी माहिती गट विकास अधिकारी शेखर सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments