अभिनेता सुशातसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याची चौकशी करा; स्वाभिमानीची मागणी

हिंदी चित्रपटमधील अभिनेता सुशातसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात केंद्र सरकार ज्या प्रमाणे सीबीआई  चौकशी करत आहे. त्याप्रमाणे राज्यातील शेतकरी आत्महत्याची सीबीआईच्या माध्यमातून चौकशी करावी. अस खोचक टिका स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. 
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर  कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल कामगारांचे वेतन व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे प्रायव्हेट फंड हे लवकरात लवकर देण्याकरता माळशिरस तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन ते बोलत होते. 

पुढे बोलताना तुपकर म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या चिरंजीव आ. रणजीतसिंह मोहिते पाटील हे शंकर करखान्याचे अध्यक्ष आहे. शंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याकडे ऊस उत्पादक सभासदांचे गणितासाठी घातलेल्या उसाचे सुमारे तीस कोटी रुपये थकित आहेत. कामगारांचे कोट्यावधी रुपये वेतन अडकून पडलेले आहे  सर्व त्वरित मिळावे कारखान्याच्या मालकीची जागा जमीन पुणे पंढरपूर पालखी महामार्ग साठी भूसंपादन झालेली आहे सदरच्या जमिनीच्या मोबदल्यात पोटी पाच ते सहा कोटी रुपये शासनाकडे अडकून पडलेले आहेत आहेत. शेतकरयांना बिलापोटी व कामगारान वेतनाचे  देण्यात यावेत, अन्यथा माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वखाली मोहिते पाटील यांच्या  बंगल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. 
माळशिरस तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलनात सभासद शेतकरी बांधव कामगार यांनी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले, शिवाजीराव चव्हाण, मगन काळे आनंता मदने, कमलाकर माने देशमुख अमरसिंह माने देशमुख ,अजित कोडग, दत्ता भोसले, मदनसिंह जाधव ,दशरथ मोरे -पाटील, रामदास गायकवाड ,महादेव सावंत, विनोद गाढवे, शिवराम गायकवाड ,पोपट रेडे पाटील, सचिन पवार, सिराज तांबोळी, व प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते

Post a Comment

0 Comments