✒️युवराज स. कदम
२०१२ साली माझे बंधूमित्र पत्रकार राहुल जाधवसर यांनी दैनिक सकाळमध्ये माझ्या भाचीबद्दल एक बातमी लिहिली होती या बातमीचे शीर्षक होते 'टेलरिंग मशीनच्या धडधडीतच तिने ओवली यशाची माळ'. ही बातमी होती माझी भाची कु. तृप्ती उर्फ धनु चंद्रकांत कागीणकर दहावीमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल. तसे पाहिले तर हे शीर्षक बरच काही सांगून जाते, या शीर्षकातील व्याप्तीमध्ये केवळ दहावीचे यश नाही तर तिच्या पूर्ण वाटचाली संबंधी अर्थ अधोरेखित होतो. कारण दहावी नंतर तिने याच संघर्षात बारावी शिक्षण चांगल्या मार्काने पूर्ण केले आणि त्यानंतर राज्यस्तरावरील फेलोशिप मधून नामपात्र खर्चात संगणक विषयात शिवाजी विद्यापीठातून इंजिनिआरिंग शिक्षण पुर्ण केले.
तिच्या आईने जवळजवळ १५ वर्षे शिलाई मशीनचे पायडंल तुडवत आणि वडीलांनीसुध्दा सायकलचे पायडंल तुडवत तिला चांगले शिक्षण दिले. आता १० बाय १२ खोलीतील संसार स्वतःच्या तीन खोलीच्या घरात फुलत चालला होता, एकूणच परिस्थिती सुधरत असतानाच आईचं आकस्मित निधन आणि धनुवर पडलेली संपूर्ण घराची जबाबदारी पुन्हा नव्या संघर्षाला सामोरे घेऊन जात होती. आकस्मात आईचे झालेले निधन हे दुःख स्वतःच्या पोटात लपवत तिने वडिलांना आणि लहान भावाला धीर देत घरची जबाबदारी पुर्ण करायला सुरुवात केली. हे करत असताना आपले करिअर सुद्धा दुर्लक्षित होणार नाही याकडे लक्ष दिले. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत घरची जबाबदारी सांभाळत आज संघर्षाला तोंड देत आहे. केवळ पुस्तकीकिडा प्रमाणे अभ्यास करणारी धनु आज कमी वयात एक जबाबदार स्त्री म्हणून आपली परिपक्वता सिध्द करत आहे. हे पाहताना आक्काचा प्रत्येक गुण म्हणजे तिच्या मम्मीचा प्रत्येक गुण तिने घेतला आहे असे जाणवते; आणि तिच्या यशाबद्दल खरोखरच खूप कौतुक वाटतय. परिस्थितीन धनुला बरच काही शिकवलं. यामुळे ती आज स्वतःच्या पायावर उभी आहे. तीच पुढील आयुष्य सुखसमृध्दीच व आरोग्यसंपन्न जावो हीच तीच्या जन्मदिनी तिच्या स्वर्गीय मम्मीकडे प्रार्थना.
धनु तुझा आम्हांला अभिमान वाटतो.
0 Comments