मंगळवेढा/प्रतिनिधी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे यांचा मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे शनिवारी सायंकाळी निदर्शनास आले.
कुमार वाघमारे यांची मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये मागासवर्गीय संस्था आहे. ते मोडनिंब येथून तीन दिवसांपूर्वी घरातून मी मंगळवेढ्याला जाऊन येतो, असे सांगून निघून गेले होते, मात्र शनिवारी त्यांच्या मृत्यूचे वृत्त मोडनिंब मध्ये सर्वत्र समजले असता कार्यकर्ते, नातेवाईक समर्थक यांनी मंगळवेठ्याकडे धाव घेतली.संबंधित ठिकाणी कुमार वाघमारे हे संशयास्पद मृतावस्थेत निदर्शनास आले. त्यांचा मृत्यू कसा झाला...?का झाला याचे गुढ रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर समजणार आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
कुमार वाघमारे हे सोलापूर जिल्ह्यात पँथरच्या चळवळी पासून सामाजिक कामाबरोबर राजकीय कामांमध्ये देखील अग्रेसर होते.केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले व माजी मंत्री राजाभाऊ सरवदे यांचे एकनिष्ठ समर्थक म्हणून देखील मोठी ओळख होती.
कुमार वाघमारे यांनी कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत मोडनिंब मधील युवकांबरोबर परप्रांतीयांना सेवा देण्याबरोबर शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले तसेच सोलापूर जिल्ह्यात अन्याय अत्याचार विरोधात सतत आवाज उठवण्याचे देखील मोठे काम करत होते.कुमार वाघमारे यांच्या मृत्यूमुळे मोडनिंब शहरासह सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यामध्ये शोककळा पसरली आहे.
0 Comments