जालना : नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंडेवाडी शिवारात घडली होती. मृत नवविवाहिता ही अल्पवयीन होती. तिचं वयाच्या अवघ्या १४ वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र, तिनं लग्नाच्या अवघ्या २१ व्या दिवशीच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गावातील ग्रामसेवकाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ३ जणांना अटक केली आहे.
जालना शहरापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील एका १४ वर्षीय नवविवाहितेने गेल्या २६ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काजल जिवाप्पा नामदे असं मृत मुलीचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती उजेडात आली.
__________________________________________📢
_________________________________________
सदर मृत नवविवाहितेचं वय अवघे १४ वर्षे असून ५ ऑगस्ट रोजी घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं होतं. लग्नाच्या अवघ्या २१ व्या दिवशी म्हणजे २६ ऑगस्ट रोजी तिने माहेरी येऊन गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत विवाहितेचं माहेर आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी माहिती दिली आहे.
नामदे आणि काटकर कुटुंबाने लॉकडाऊन सुरू असतानाच ऑगस्ट महिन्यात काजल नामदे या १४ वर्षीय मुलीचा विवाह केला होता. या विवाहानंतर काजल खूपच अस्वस्थ होती. अखेर २६ ऑगस्ट रोजी तिने आत्महत्या करत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
0 Comments