उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’; कंगणाने उधळली मुक्ताफळं


 कंगणा राणावत तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला ती उटलून प्रतिक्रिया देत आहे. अशातच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती.

माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, कंगणाने केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेमुळे तिच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Post a Comment

0 Comments