विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्याच्या धाराशिव युवती जिल्हाध्यक्षपदी स्नेहलताई भोसले यांची निवड



भूम/प्रतिनिधी:

मराठा समाजासाठी नेहमी विविध उपक्रम राबविणाऱ्या आणि शिवसमाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या विश्व मराठा संघ महाराष्ट्र यांच्या धाराशिव युवती जिल्हाध्यक्षपदी स्नेहलताई भोसले यांची निवड झाली आहे.

समाजाप्रती अतिशय संवेदनशीलपणे कार्य करण्यात असणारा पुढाकार, समाजातील वंचितासाठीची धडपड व विश्व मराठा संघाच्या कार्यात सहभाग यांमुळेच स्नेहलताई भोसले यांची निवड करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांतदादा भोसले यांनी सदर निवड केली आहे,तर महिला प्रदेशाध्यक्ष सौ छायाताई भगत यांच्या सहकार्य लाभले.
__________________________________________📢
(Advertise)
__________________________________________
त्यांच्या निवडीचे विश्व मराठा संघ धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अजित तांबे व कार्याध्यक्ष उमेश जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments