विठ्ठल मंदिर 31 सप्टेंबर पर्यंत बंदच



पंढरपूर/प्रतिनिधी;

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे.
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे .
   
राज्य सरकारने लोक डाऊन ३० सप्टेंबर पर्यंत वाढविला असल्याने या कालावधीत धार्मिक स्थळ बंदच राहणार आहेत त्यामुळे पंढरपूरचे मंदिर देखील बंद राहणार आहे.  कोरोना मुळे श्री विठ्ठल मंदिर हे १७ मार्च पासून बंद आहे. 
   
सोमवारी बहुजन वंचित आणि वारकरी सेनेच्या वतीने विठ्ठल मंदिर भविकाना दर्शनासाठी खुले कारवें म्हणून आंदोलन केले होते. राज्य सरकारने धार्मिक स्थळ खुले करण्यासाठी नियमावली तयार करून विठ्ठल मंदिर आठ दिवसात खुले करण्याचे आश्वासन यावेळी दिले होते. त्यामुळे वंचित आणि वारकरी सेनेने राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.
 कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर ३१ 
सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या काळात विठोबाचा काकडा , धुपारती , शेजारती असे नित्योपचार पुजा सुरु राहणार आहे. अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments