पांगरी/ प्रतिनिधी:
पत्नी व मुलींची छेड करणाऱ्या सालकरी गड्याचा शेतकरी मालकांने खुन केल्याची घटना पांगरी शिवारात घडली, वारंवार पत्नीची छेड काढणाऱ्या सालगड्याची गळा आवळून मित्रांच्या मदतीने खुन केल्याची माहिती समजते. संशयित आरोपींना अटक केली असून,उत्तम नारायण कांबळे हे खून झालेल्या सालगड्याचे नाव आहे.
शिवाजी बोकेफोडे, रवी बोकेफोडे तसेच सालगड्या चा चुलत मेव्हणा राहूल माने अशी संशयित आरोपीची नावे आहेत. रात्री अकरा वाजता मासे धरायला चल म्हणून आरोपींला घेऊन गेले. मात्र त्या रात्रीनंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे मयत व्यक्तीच्या घरांच्यानी शेतीमालकां विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसी खाक्यानंतर सदर व्यक्तीचा मयत सालगड्याचा देह विहिरीत टाकल्याची कुबली आरोपींनी दिली.
0 Comments