बार्शीतील युवकांचा आदर्शवत उपक्रम; विविध बियाण्यापासून पर्यावरणपूरक राख्या



जलमित्र संदीप पवारचं पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन

बार्शी : सध्याच्या काळात कोरोनामुळे बाजारपेठेत गेल्यामुळे होणार्‍या संसर्गाचा धोका तसेच चीन बरोबर सध्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी राख्यांवर बहिष्काराचे होत असलेले आवाहन, यामुळे जलमित्र संदीप पवार यांनी घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करत पर्यावरणपूरक राख्या बनवुन आदर्शवत काम केले आहे.

प्रत्येक वर्षी रक्षा बंधन झाल्यानंतर सगळ्या राख्या या अखेर कचर्‍यातच जातात, ह्या युवकांने बनविलेल्या या राख्या या विविध बियाणेयुक्त असल्यामुळे सणाच्या आनंदाबरोबरच भाऊ बहिणाला पर्यावरण संतुलनाला मदत केल्याचे समाधान मिळणार आहे. संदीप पवार यांनी पाणी फाऊंडेशनच्या चळवळीमध्ये भरपूर प्रमाणात काम केलं आहे.
 राख्या तयार करताना इतर कोणत्याही झगमगाटी वस्तूंपेक्षा बियाण्यांचा वापर केल्यास सणानंतर हेच बियाणे वृक्षारोपणासाठी मदतीला येतील, ह्या विचारानेच  त्यांनी घरात उपलब्ध असलेल्या डाळी, तांदूळ, जिरी, मोहरी, गहू, दोडका, कारले, भोपळा, शेवरी, भेंडी, करंजी, मेथी, शेवगा यांसारख्या सहज उपलब्ध होणार्‍या अनेक बिया वापरल्या आहेत.
______________________

*ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-*

https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/

___________________________

राखी बांधायला लेस म्हणून जुन्या साडीचा कपडा वापरला. यात कुठंही प्लास्टिक, कलर किंवा निसर्गाला हानी पोचवणारी एकही गोष्ट त्यांनी वापरली नाही. ही राखी जर मातीमध्ये पुरून टाकली तर नक्कीच फायदेशीर ठरेल. असे वेगळे प्रयोग करून कोरोना संक्रमणापासून कुटुंबाला दूर ठेवा. झाडं हे पर्यावरण संवर्धनासाठी अंत्यत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments