भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दुःखद निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी इस्पितळात उपचार सूरु होते.कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र फुफुसाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे ते कोमात गेले होते.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करून निधनाची माहिती जाहीर केली.

काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी भारताचे १३ वे राष्ट्रपती होते.अर्थशास्त्राचे अभ्यासक नेते म्हणूनही ते प्रसिद्ध होत.

Post a Comment

0 Comments