वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर रुग्णालयास भेट देऊन त्या ठिकाणच्या नियोजनाचा आढावा घेतला.
यावेळी, कोरोना रुग्णांची सद्यस्थिती आणि नियोजन यावर डॉक्टरांशी चर्चा करून त्याठिकाणच्या वास्तविक परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या सीपीआर रुग्णालयामध्ये एकूण ४०० बेड्सची व्यवस्था आहे. त्यामध्ये ऑक्सिजनयुक्त १०४ बेड्स आहेत.आज ४० ऑक्सिजनयुक्त बेड्स नव्याने उपलब्ध करण्यात आले असून येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये अजून ८० ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, इमरजेंसीसाठी ८ बेड्स राखीव असून कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून तात्काळ उपचार सुरु करण्याच्या सूचना यावेळी रुग्णालय प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
0 Comments