काही महिन्यांपासून राज्यच नाहीतर देशभरात आपल्यावर आणि आपल्या सर्वच सण उत्सवांवर कोरोना (कोव्हीड-१९) आजाराचे सावट आहे. अशा परिस्थितीत मी माझा वाढदिवस साजरा करणे हे सामाजिक जाणिवांना धरून नाही. हे माजी आमदार मोटे यांनी जाहीर केल्यानंतर सिरसाव मध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कोविड-१९ या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली होती. मात्र, रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून व इतर दक्षता घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा करण्यात आले होते. म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि शिस्त पाळून रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पवार, उपसरपंच बिरमल बोबडे, माजी उपसरपंच परमेश्वर (आबा) मुके, अनंत जाधव, श्रीगणेश चोबे, अंगद चोबे, दत्ता वायकुळे, बाळाजी पाटील, बापू जाधव, विकी चोबे, सुधीर टकले, रामेश्वर चोबे, संदीप पाटील, विकास चोबे, समाधान चोबे,गोविंद चोबे, रणजित चोबे, दीपक नवले, ऋतिक मुके, आदित्य चोबे, दत्तराज चोबे यांच्यासह सिरसावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments