वाठारमध्ये आज वाढीव वीज बिलाची होळी; नागरिक संतप्त


लाजरस कदम/ वाठार:

कोरोना महामारीच्या संकटामुळे केंद्र शासन व राज्य शासन यांनी लाँकडाऊन जाहीर केला होता. हा कालावधी 4 महीने लाँकडाऊन मध्येच गेले, या कालावधीमध्ये सर्व उधोगधंदे ठप्प होते.तसेच मोठा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.मोठ्या उद्योगापासून ते लहान उधोगपर्यत सर्व बंद होते. यामुळे सर्वसामान्य जनता घरात बसुन होती .

या काळात बरेच संकट जणतेसमोर आलीत तसेच या काळातील विज बिल वाढीव दराने आले असल्याने हे विज बिल सरकार ने सरसकट माफ करावे म्हणुन वाठारमधील सर्व  ग्रामस्थ व परिसरातील नागरिक, विविध संस्था गावातील व्यापारी वर्ग व उद्योजक यांच्या वतीने आज  वाठार गावामध्ये ग्रामपंचायत पटांगणात विज बिलाची होळी करण्यात आली.  वाठार गावात  प्रशासकीय अधिकारी यांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करून निवेदन देण्यात आले.
  
यावेळी वाठार गावचे लोकनेते वारणा दुध संघाचे संचालक  महेंद्र शिंदे (चेअरमन) यांनी गावच्यावतीने लाँकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ होण्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे कळविणे करता १००० लोकांच्या सहीचे निवेदन महावितरण अभियंता हुजरे साहेब,ग्रामसेवक अशोक भोसले, तलाठी शामराव पाटील यांना दिले  यावेळी मंडल अधिकारी अनिता खाडे, ग्रामपंचायत सदस्या पुप्षाजंली क्षीरसागर, अनिता कुंभार, ललिता पाटील प्रगतशील शेतकरी मोहन पाटील,  दत्त सेवा सोसायटीचे चेअरमन परशुराम मस्के, संचालक सुहास पाटील, राजाराम क्षीरसागर, बी.जी.पाटील सुरेश पाटील, पंडित शिंदे, महेश कुंभार, विनायक शेटे अभिजित सुतार, विलास वाक्से (मेजर),  किरण वाक्से, बागल पटाईत,  संजय क्षीरसागर, सुरज नदाफ, दिपक क्षीरसागर यांच्यासह वाठार गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण कार्यकर्ते ग्रामस्थ विविध संस्थाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments