पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त; प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर हादरलं प्रशासन



पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात प्रशासन हादरलं आहे. प्रकाश आंबेडकर आज पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  
पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी एसटी वाहतूक बंद असणार आहे.

बाजारपेठा,मॉल सर्वकाही खुले केले असताना धार्मिक स्थळ बंद का अशी विचारणा करत आज पंढरपूर मध्ये बहुजन वंचित विकास आघाडीतर्फे  लाखो वारकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.

Post a Comment

0 Comments